“मी राष्ट्रवादी सोबतच आहे”: अजित पवार

मुंबई: एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत दिले आहेत. राज्याच्या उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार रविवारी सोशल मीडियावर सक्रीय झालेले आहेत. शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलेल्या सर्व भाजपा नेत्यांचे अजित पवार यांनी आभार मानले आहेत. यानंतर अजित पवार यांनी दुसरं धक्कादायक ट्विट केले आहे. त्यामध्ये “मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत”, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. त्यासोबच “भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला ५ वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू,” असेही अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच हा सर्वोच्च न्यायालयात गेलेला असून सर्वोच्च न्यायालय सोमवारी सकाळी साडे दहावाजता निकाल देणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा