नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२०: भारतीय स्मार्टफोन निर्माता मायक्रोमॅक्स पुन्हा एकदा बाजारात पुनरागमन करीत आहे. आज कंपनी ‘इन’ सिरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. मायक्रोमॅक्सचा व्हर्च्युअल कार्यक्रम दुपारी १२ वाजता सुरू होईल. कंपनीच्या सोशल मीडिया आणि यूट्यूब हँडलवरून हे थेट प्रवाहित केलं जाईल. किमान कंपनी आज दोन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
कंपनीनं ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टबरोबर भागीदारी केली आहे. हे स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर विकले जातील. दोन्ही फोन बजेट आणि मिड रेंज सेगमेंटचे असतील.
या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये काय खास असंल?
कंपनीनं टीझर जारी केला आहे आणि हा फोन ग्रेडियंट डिझाइनमध्ये दिसत आहे. फोनच्या मागील बाजूस ग्रेडियंटमध्ये एक्स आकार दिसत आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर दिले जातील. मायक्रोमॅक्स इन सीरिज स्मार्टफोन अँड्रॉइड १० बेस्ड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमसह लॉन्च केले जातील आणि सध्या ही ऑपरेटिंग सिस्टम जास्त कस्टमाईज नसणार.
मायक्रोमॅक्सचा हा बजेट स्मार्टफोन ६,९९९ रुपयांचा असू शकतो. अहवालानुसार त्यामध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या बजेट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर असंल आणि ५००० एमएएच बॅटरीसह तीन बॅक कॅमेरे दिले जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे