केरळमध्ये भारतातील पहिल्या AI शाळेचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

केरळ, २६ ऑगस्ट २०२३ : केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली AI शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी एआय स्कूलचे उद्घाटन केले. पहिली AI शाळा इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. या AI शाळेची निर्मिती तसेच डिझाईनिंग अमेरिकेतील आय लर्निग इंजिन तसेच वैदिक ई स्कुल दवारे करण्यात आली आहे, एआय टूल्सच्या मदतीने, अभ्यासक्रम डिझाइन, वैयक्तिकृत शिक्षण, मूल्यांकन आणि शाळेतील विद्यार्थी समर्थन यांसह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये त्याचा वापर केला जाईल.

ह्या शाळेत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठात स्काॅलरशिप प्राप्त करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. याने विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठातुन उच्च शिक्षण करण्याचा लाभ प्राप्त होईल. ए आय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भविष्यातील सर्व स्पर्धांसाठी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्यात येणार आहे. ह्या AI शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्मरण तंत्र, करीअर नियोजन इत्यादी महत्वाच्या विषयावर माहीती प्रदान केली जाईल. करीअर विषयी समुपदेशन‌ करण्यात येईल. एवढेच नव्हे तर विविध स्तरीय चाचण्यांची देखील माहीती देण्यात येणार आहे.

Ai शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाते. शालेय परीक्षांव्यतिरिक्त, मुलांना JEE, NEET, CUET, CLAT, GMAT आणि IELTS सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केले जाते. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार होतील. AI शाळेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत करते. त्यांना प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मार्गदर्शन करते, जेणेकरून विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा