मायक्रोसॉफ्टचा कर्मचार्‍यांना मोठा झटका; हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ!

वॉशिंग्टन, १८ जानेवारी २०२३ : ट्विटर आणि अमेझॉन पाठोपाठ आता मायक्रोसॉफ्टही हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांपैकी पाच टक्के किंवा सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात मानव संसाधन आणि अभियांत्रिकी विभागांमध्ये हजारो नोकऱ्या कपातीची अपेक्षा आहे. ही नोकरकपात यूएस तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीनतम कपात असेल. याआधी देखील मायक्रोसॉफ्टने विविध विभागातील एक हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ३० जूनपर्यंत कंपनीकडे २२२,००० पूर्ण वेळ कर्मचारी होते. यात युनायटेड स्टेट्समधील १२२,००० आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ९९,००० कर्मचारी होते. पर्सनल कॉम्प्युटर मार्केटमधील मंदीमुळे विंडोज आणि उपकरणांच्या विक्रीला धक्का बसल्यानंतर मायक्रोसॉफ्टवर त्याच्या क्लाउड युनिट अझूरवर वाढीचा दर राखण्याचा दबाव आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी एका मुलाखतीत नाडेला कबूल केले की, मायक्रोसॉफ्ट जागतिक बदलांपासून मुक्त नाही. तसेच तंत्रज्ञान कंपन्यांनी कार्यक्षम असण्याची गरज आहे. पुढील दोन वर्षे कदाचित सर्वात आव्हानात्मक असतील, असे नाडेला म्हणाले आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आमच्याकडे खूप तेजी होती आणि त्या मागणीही सामान्य होती. मात्र जगाच्या काही भागात आता खरी मंदी जाणवत आहे, असेही नाडेला शेवटी म्हणाले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा