मायक्रोसॉफ्ट Office ३६५ चे नाव बदलणार

पुणे, १७ ऑक्टोंबर २०२२ : मायक्रोसॉफ्ट पुढील महिन्यापासून Office ३६५ चे नाव बदलणार असून, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ नोव्हेंबर २०२२ पासून मायक्रोसॉफ्ट ३६५ म्हणून ओळखले जाणार आहे. एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच याचे नाव बदलण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट यासारख्या नावांमधून ऑफिस हे ब्रँडिंग काढून टाकणार आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टने FAQs वर ही माहिती दिली आहे.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप Office.com द्वारे अॅक्सेस केले जात आहे, परंतु भविष्यात हे डोमेन Microsoft365.com असे असेल. FAQs नुसार, करण्यात येणारे नावातील बदल पुढील महिन्यापासून होणार असून, हे बदल सर्व Windows, MacOS, iOS आणि Android डिव्हाइसेसवर दिसून येतील. याशिवाय कंपनी मोबाईल आणि डेस्कटॉपसाठी मायक्रोसॉफ्ट ३६५ नावाचे वेगळे अॅप लॉन्च करणार असून, हे अॅप वापरकर्त्यांना नाव बदलण्याबाबतही माहिती देईल.

नव्या नावानुसार लोगो देखील बदलणार आहे. मायक्रोसॉफ्टकडून करण्यात येणारे लोगो ते डिझाइनमधील बदल केवळ Microsoft 365 मधील अॅप्सना लागू होणार आहेत. Word, Excel, PowerPoint, Teams, Outlook, Clipchamp, Stream आणि Designer ची नावे आणि ब्रँडिंग जुन्या पद्धतीसारखेच असणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये, Microsoft ३६५ आमच्या फ्लॅगशिप उत्पादकता सूटमध्ये विकसित झाला आहे, म्हणून आम्ही Microsoft ३६५ मधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी एक अनुभव तयार करत आहोत. येत्या काही महिन्यांत, Office.com, Office मोबाइल अॅप आणि विंडोजसाठी ऑफिस अॅप मायक्रोसॉफ्ट ३६५ अॅप बनेल, नवीन आयकॉन, नवीन लुक आणि आणखी वैशिष्ट्यांसह, ते असेल, असे FAQ मध्ये सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा