वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट २०२०: पूर्व हेविवेट चॅम्पियन माईक टायसन यांचा रिंग मधील कमबॅक सामना २८ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ५४ वर्षीय माईक टायसन या बॉक्सरचा सामना पूर्व फोर व्हेट वर्ल्ड चॅम्पियन रॉय जोन्स ज्युनिअर यांच्यासोबत लॉस एंजेलिस मध्ये एका एक्जिबिशन सामन्यात होणार होता.
तसेच हा सामना १२ सप्टेंबरला पडणार होता. तसेच माईक टायसन यावर म्हणाले की, ” सामन्याच्या तारखा पुढे ढकलल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या सामन्याचा आनंद घेता येईल.” माईक टायसन हे शेवटची लढत २००५ साली लढले होते. त्यानंतर ते रिंग मध्ये लढण्यासाठी उतरले नाही. तसेच शेवटच्या सामन्यात ते इरिष्मान केविन मक ब्राईड यांच्याकडून पराभूत झाले होते आणि त्यांच्या कारकिर्दीत ल्या ५८ सामन्यांपैकी त्यांचा हा ६ वा पराभव होता.
तसेच रॉय जोन्स हा ५१ वर्षीय बॉक्सर २०१८ पासून रिंग मध्ये लढण्यासाठी नाही उतरला आहे. तसेच कॅलिफोर्निया स्टेट अैथलेटिक कमिशनने या सामन्याचा आनंद घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहे, प्रेक्षकांना हा सामना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण हा सामना पे – पर- व्हिव असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: