अरुणाचल प्रदेश, २८ जुलै २०२३ : अरुणाचल प्रदेशातील पेंगीनच्या उत्तरेला आज सकाळी ८.५० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.०० रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. अरुणाचल प्रदेशात भूकंप होण्याची ही या आठवड्यातील दुसरी वेळ आहे.
यापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एकदा भूकंपाचे धक्के बसले होते. शनिवारी २२ जुलै रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्येही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. आजच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर