मिलिंद देवरा करणार काँग्रेसला रामराम?

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या राजकीय स्फोटामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मात्र आता शिंदेंच्या या बंडानंतर महाराष्ट्रात देखील काँग्रेसचे नाराज दिग्गज नेते काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता आता काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे नाव आहे मिलिंद देवरा.
मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे अतिशय विश्वासू सहकारी समजले जातात. राहुल यांच्या अनेक परदेश दौऱ्यात मिलिंद देवरा त्यांच्यासोबत असल्याचं अनेकांनी पाहिलं आहे.मात्र अलीकडच्या काळात ते काँग्रेसवर नाराज असल्याचं लपून राहिलेलं नाहीये.

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं. त्यांच्या प्रशंसेला मोदींनी ट्वीटद्वारे उत्तर दिलं होतं. तेव्हापासून ते काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. देशभर धुळवड अतिशय उत्साहात साजरी होत असताना मध्यप्रदेशनंतर आता महाराष्ट्रात देखील राजकारणाला रंग चढू लागला आगहे.

दरम्यान, काँग्रेसच्या १९ आमदारांनीही राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. लवकरच शिवराज सिंह चौहाण सरकार स्थापन करतील, असा दावा भाजप करत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा