औरंगाबाद, १ सप्टेंबर २०२०: देऊळ , मंदिरे आणि धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी भाविकांबरोबरच आता राजकीय नेते देखील सहभागी होण्यास सुरूवात झाली आहे. काल प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर मध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. तर आता एम आय एम चे नेते मंडळी औरंगाबाद मध्ये नागरिकांसह मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत.
अनंत चतुर्थीच्या दिवशी सर्व भाविकांसाठी मंदिरे उघडी करा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. तर उद्या म्हणजेच २ सप्टेंबर रोजी मशिदी उघडणारच असा फतवा देखील त्यांनी काढला आहे. शिवाय परवानगी द्या अथवा नका देऊ तरीदेखील सर्व नियमांचे पालन करत मशिदी मध्ये जाऊन प्रार्थना करणारच असे आव्हान देखील त्यांनी केल आहे.
आज दुपारनंतर हे आंदोलन सुरू करू असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, हे आंदोलन किती वाजता सुरू करण्यात येईल याबाबत काहीही सांगितले नाही. याबाबत योग्य ती माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू असे देखील त्यांनी सांगितले. हे आंदोलन एमआयएमचे अध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील करणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी