मिनी ट्रक, लॉरीचा भीषण अपघात; पाच जागीच ठार

24

तेलंगणा : येथे लॉकडाऊन दरम्यान पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. मिनी ट्रक आणि लॉरीची एकमेकांना धडक झाली आणि भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लॉकडाऊनदम्यान घराबाहेर न पडण्याचा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या असतानाही हे लोक प्रवास करत होते. मिनी ट्रकमध्ये ३० लोक प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण कर्नाटकचे होते.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर हे सर्वजण आपल्या घरी तेलंगणाहून कर्नाटकला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. याबाबत शमशाबाद पोलीस अधिकारी व्यंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी ट्रेकमधील सर्व लोक मजूर होते. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा