राज्याचे गृहनिर्माण मंत्री करणार प्लाझ्मा दान

मुंबई, दि.१७ जुलै २०२० : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हड यांनी आता प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ते रुग्णालयात जाऊन प्लाझा डोनेट करणार असल्याची माहिती त्यांनी  ट्विटरवरून दिली.

काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, दोन महिन्यांनी त्यांनी आपली रक्त चाचणी केली. रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता कोरोना रुग्णासाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणले आव्हाड?

“मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अाशिर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,” असं आव्हाड म्हणाले.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात. पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी रुग्णाला दिल्या जातात. ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना सरकारने  प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आता खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे प्लाझ्मा दान करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा