गोल पोस्ट इतर राजकारण मिशन बारामतीचं डिपॉझिट जप्त होईल, अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

मिशन बारामतीचं डिपॉझिट जप्त होईल, अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

पुणे, ८ सप्टेंबर २०२२ : आगामी होणाऱ्या लोकसभे साठी भाजप ने राष्ट्रवादीचा गड बारामती मध्ये सत्ता काबीज करायची आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली. आगामी २०२४ च्या विजयासाठी भाजपकडून मिशन इंडिया मिशन महाराष्ट्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना सांगतात आमचं मिशन महाराष्ट्र चालू आहे आणि बारामती हे महाराष्ट्रा मध्ये येते. आणि याच फडणवीसांच्या विधानावर विरोधी पक्ष नेते अजित पवार बोलतात की बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही उगाच डिपॉझिट जप्त होईल तुमचं, असा पहाटेच्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

पुढे अजित पवार बोलतात की, बारामतीला धडका मारून काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा सल्ला देखिल अजित पवारांनी भाजपला दिला आहे. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताने निवडून येतो, असा खोचक टोलादेखील अजित पवारांनी फडणवीसांना लावला आहे आणि उगाच बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, सर्वांचं डिपॉझिट जप्त होईल अशी टीका ही केली आहे.

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सध्याचे सत्तेतील सरकार स्थगिती सरकार असून, हे सरकार केवळ मविआ सरकारच्या काळातील कामांना थाबवण्याच काम करत आहे. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मविआ सरकारने चांगले कामेही केली आहेत अशी आठवण ही अजित पवारांनी यावेळी करून दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version