मिझोराम मध्ये ४.१ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा झटका

चांम्फाई, २४ जून २०२० : आज सकाळी चांम्फाई , मिझोराम येथे ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय सिस्मोलॉजी केंद्राने सांगितले की, बुधवारी सकाळी ८.०२ मि ने चांम्फाईच्या दक्षिण पूर्व ३१ किमी अंतरावर भुकंपाचा केंद्रबिंदु होता.

या भुकंपानंतर बोलताना मोझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा म्हणाले की, ” मागील बारा तासात ५.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे दोन भुकंपाचे झटके बसले असून आयझॉलच्या उत्तर पूर्व २५ किमी वर त्याचा केंद्र बिंदू होता.

राज्य संस्थेच्या मते चांम्फाई मध्ये १८ जून रोजी सुध्दा झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० इतकी होती. आज झालेल्या भुकंपात कोणतीही जिवीतहानी अथवा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा