आमदार बबनराव शिंदे यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांना घेऊन केली पुरग्रस्त भागाची पहानी

माढा दि.२२ ऑक्टोबर २०२० आमदार बबनदादा शिंदे हे भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी माढा तालुक्यातील कोंडारभागातील रांझणी, आलेगाव,रूई,टाकळी, चांदज,गारअकोले,वडोल,आढेगाव यागावामधे आलेले असताना त्यांनी भीमा नदीच्या पुलाचे दुरुस्तीचे काम व पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच दोन्ही बाजूने काँक्रीटचे गटारे बांधण्याचे आश्वासन दिले.आणि संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
त्याच बरोबर अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेती पिकांचे,वाहून गेलेल्या शेतीचे,घरांच्या नुकसानीचे वाहून गेलेलं कृषी पंप यांचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले
तसेच लाईटचे पोल, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले .यावेळी ग्रामपंचायत गारअकोले मार्फत दिव्यांगनिधीचे वाटप करण्यात आले.

मौजे रांझणी,आलेगाव (बु),रूई,आलेगांव(खु),गारअकोले,टाकळी ता.माढा येथिल कोंढार भागातील भिमानदी काठावरील गावांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांनी पुरग्रस्थांची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन अधिका-यांना नूकसान ग्रस्तांचे ताबडतोब पंचनामे करणेसाठी सूचाना देण्यात आल्या.नुकसान ग्रस्त शेतक-यांपैकी कोणीही पंचनामा केल्यावीना राहू नये याची दक्षता घेण्यात यावी.आशा प्रकारच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.विजेचे पोल पडलेले आहेत ते लवाकरात लवकर ऊभे करून खंडीत आसलेला विज पूरवठा सुरळीतपणे चालू करणे वीज महावितरण अधिका-यांना सुचना दिल्या.तसेच ज्या लोकांच्या घरामध्ये पूराचे पाणी आले आहे अशा सर्व कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.या कुटूंबांना त्वरीत धान्य वाटप करणेसाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत.यावेळी तहसीलादार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी संताजी पाटील,तालुका कृषी अधिकारी जाधव,मा.कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर,जि.प.सदस्य शिवाजीराव पाटील,उपसभापती धनाजी जवळगे,माणिक पवार, सरपंच जितेंद्र गायकवाड,सरपंच अण्णा गायकवाड,धर्मराज पाटील,वसंत पाटील, उजनीचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव पाटील,सुरेश बिचकुले, संपत पवार, हरिदास वाळेकर, सुरेश पवार,लक्षमण बिचकुले, अंकुश बिचकुले,तात्यासो देवकाते, पोलीस पाटील मारुती शिंदे, दत्तु केचे, दादा जाधव, दत्तू जाधव, तुकाराम पवार, धनाजी पवार, धनाजी पवार, राजेंद्र निकम, रामदास शेळके,विजय केचे, महादेव बिचकुले,नवनाथ निकम, प्रताप गायकवाड,
गारअकोले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच मंडळ अधिकारी,पाटबंधारे, विधुत मंडळ, बांधकाम विभाग,जिल्हापरिषद, कृषी विभाग ग्रामसेवक, तलाठी विविध गावचे सरपंच,ग्रामस्थ,पुरग्रस्थ शेतकरी उपस्थीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा