आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांनी ३ रुग्णवाहिका दिल्या भेट

10

उस्मानाबाद, ६ ऑगस्ट २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. तरी, यास्थिती मध्ये रुग्णांची ने-आण करण्यासाठी अॅम्बुलन्सची कमतरता होता कामा नये, या विचाराने माजी पालकमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्सच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालय आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी ३ अॅम्बुलन्स जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्याकडे देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी यांच्याकडे या अॅम्बुलन्स देते प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड.