राशिनचे श्री जगंदबा देवी मंदिर धार्मिक पर्यटन क्षेत्र करण्याचा आमदार रोहित पवार यांचा मानस

राशिन, दि. २१ जून २०२०: राशिनचे श्री जगंदबा मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून राशिन हे धार्मिक पर्यटन विकास क्षेत्र म्हणून चालना दिल्यास निश्चित त्यांचा फायदा हा राशिन आणि परिसरातील गावांना देखील चांगलाच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

राशिनच्या धार्मिक पर्यटन विकासासाठी दिनांक २० रोजी आमदार रोहित पवार यांनी अधिकारी पदाधिकारी यांच्यासह बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत जगंदबा मंदिर परिसरातील जागेचा वापर कसा करता येईल. गावातील विष्णू मंदिर काशी विश्वेश्वर मंदिरचा परिसर सुशोभित करता येईल. रयत शिक्षण संस्थाकडे असलेल्या जागे कढील कसा वापर करता येईल तसेच राशिन मधील मोकळ्या जागेची सर्वांशी सविस्तर चर्चा देखील केली.

कुकडी काॅलनी येथे झालेल्या या बैठकीसाठी प्रांत अधिकारी अर्चना नाष्टे तहसीलदार नानासाहेब आगळे गट विकासधिकारी अमोल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा