आमदार रोहित पवार यांनी दिलेला शब्द पाळला

10

कर्जत, दि. ८ जून २०२०: कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवारांनी कुकडीच्या आवर्तनाचा दिलेला शब्द पाळला आहे. त्यांनी शेतकरी वर्गाचा फार मोठा प्रश्न मार्गी लावला आहे. रोहित पवार यांनी सांगितले होते की, ६ जूनला कुकडीचे आवर्तन हे येणारच आणि तो शब्द देखील त्यांनी पुर्ण करून दाखवला आहे.

कुकडीचे अवर्तन ६ जून रोजी संध्याकाळी सुटले आहे. पाणी हे केडगाव मधून ५०० क्युसेकने सुटले आहे. अशी माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. कुकडीचे आवर्तन हे ६ जून रोजी सुटणार हे रोहित पवार यांनी अश्वासन दिले होते. १ जून रोजी भाजपचे माजी जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर बसून लाक्षणिक उपोषण केले होते. राम शिंदे यांनी आरोप देखील केला होता की, रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना पाणी देऊ म्हणून फसवले आहे. मात्र प्रत्यक्षात ते ६ जूनला पाणी सुटणार नाही असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

कुकडीच्या डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने पाणी देखील सुटले आहे. या आवर्तनातून श्रीगोंद्यासाठी पाच दिवस कर्जतसाठी सात दिवस आणि करमाळ्यासाठी सहा दिवस पाणी सुटणार आहे. या पिण्याच्या पाण्यामुळे शेतकरी वर्गाला देखील शेतीसाठी पाणी मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष