ढग फुटी नंतर आमदार संजय जगताप यांनी केली नुकसानीची पाहणी

13

पुरंदर, १० सप्टेंबर २०२० : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी आणि कांबळवाडी या परिसरात झालेल्या अतिवृष्टी नंतर पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी याभागात पहाणी केलीय.दोन दिवस सलग या भागात १०० मीलीमिटर पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे येथील शेती बंधारे आणि जागोजागी रस्तेही वाहुन गेले आहेत.

आमदार संजय जगताप यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाणी केलीय. यावेळी शेतक-यांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून ते ही भावूक झाले.खचुन जाऊ नका. शासनाच्यावतीने मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी लोकांना दिलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी