पुरंदर तालुक्यातील रखडलेल्या पालखी मार्गाचा प्रश्न सुटला आ.संजय जगताप

पुरंदर दि.१०, ऑक्टोबर २०२० : पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गाचा गेली आकार वर्ष रखडलेला प्रश्न लोकांशी संवाद साधून सोडविण्यात यश आले असल्याचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी आज जेजुरी येथे माध्यमांशी बाेलाताना सांगितले आहे.त्यामुळे पुरंदर तालुक्यातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम गेल्या दहा वर्ष पासून रखडले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काळात उपमुख्यमंत्री असताना व माजी आमदार अशोकराव टेकवडे पुरंदरचे आमदार असताना या रस्त्याचे काम सुरु झाले होते. मात्र माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काम बंद पडले होते.त्यामुळे हा रस्ता रखडला होता.त्यामुळे नीरा ते जेजुरी दरम्यानच्या अरुंद रस्त्याने प्रवास करताना वाहन चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यासाठी अधिग्रहित करीत असताना त्यांना योग्य मोबदला व जागेचे योग्य मोजमाप शासन व अधिकारी करीत नसल्याने खळद येथील काही शेतकरी न्यायालयात गेले होते.

या लोकांना योग्य व न्याय्य मोबदला मिळाला तर त्यांची रस्त्याला कोणतीच हरकत नव्हती. मात्र त्याकाळचे आमदार प्रशासन व शेतकरी यांच्यात समेट घालण्यात अपयशी ठरले.आणि पुढे ते मंत्री झाले तरी तो प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. आमदार संजय जगताप यांनी खा.सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न विचारात घेवून लोकांना योग्य मोबदला देत नीरा ते जेजुरी दरम्यानच्या शेतकऱ्यांना मोबदलाही दिला.आता जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून बहुतेक सर्वच शेतकऱ्यांनी रस्त्याला सहमती दर्शवली आहे.प्रथम टप्प्यात नीरा ते जेजुरी मार्ग पूर्ण करणार असल्याचे आ.जगताप यांनी म्हटले आहे.त्याच बरोबर जेजुरी ते हडपसर दरम्यानचे राहिलेले कामही लवकरच सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. जेजुरी शहरातील व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानी बाबत राष्ट्रीय रस्ते वाहतूक विभागाशी चर्चा करून व्यापाऱ्यांचं होणार नुकसान कसं टाळता येईल याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीचा प्रस्तावीत असणारा ४५ मीटरचा रस्ता कसा कमी करता येईल व लोकांचं नुकसान टाळून गावचं गावपण टिकवून ठेवण्या बाबत चर्चा झाली आहे. लोकांचं कमीत कमी नुकसान करून लोक सहभागातून जमीन अधिग्रहण पूर्ण करू असा विश्वास संजय जगताप यानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.या वेळी त्यांचे बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष संभाजी झेंडे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी :राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा