आमदारांचा ‘गुड मॉर्निंग’ धमाका; विद्यार्थ्यांच्या स्वागताला खास हजेरी

26
MLA Special Welcome for Students on First Day of School
आमदारांचा 'गुड मॉर्निंग' धमाका.

MLA Special Welcome for Students on First Day of School: शाळेच्या पहिल्या दिवशी आता विद्यार्थी आमदारांच्या ‘गुड मॉर्निंग’ने मंत्रमुग्ध होणार आहेत. शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ हा अनोखा कार्यक्रम जाहीर केला असून, या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार खास भेट

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण मिळावे, या हेतूने दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात. यंदा मात्र शिक्षण विभागाने एक अनोखी संकल्पना मांडली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे.

आमदार वाटणार गुलाबपुष्प आणि खाऊ

पालकमंत्री, आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुष्पगुच्छ आणि खाऊ देऊन त्यांचे स्वागत करतील. शहरात प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या ६७५ शाळा आहेत, तर महापालिकेच्या ११८ शाळा आहेत. यापूर्वी शिक्षकांकडून ढोल-ताशांच्या गजरात गुलाबाची फुले आणि खाऊ देऊन स्वागत केले जायचे.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

आमदारांची नावे विद्यार्थ्यांना माहीत असतात, पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या उपक्रमामुळे मिळणार आहे. आमदार शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम
शिक्षण विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा