मनसे आता क्रियाशील

पुणे, २० ऑक्टोबर २०२२ : सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा सगळीकडे होत असताना आता मनसे नक्की काय पाऊल उचलत आहे? याकडे इतर पक्ष लक्ष ठेवून आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला.

यावरुन आता मनसे पुन्हा क्रियाशील होत असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी मनसे पक्ष काढल्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारे टिका करण्यात आली. हा पक्ष टिकणार नाही किंवा पुढे जाणार नाही असंही सांगण्यात येत होतं. त्यामुळे मनसेचं काय होणार ? असे प्रश्न चर्चेत येत होते.

पण आता मनसे पक्षात अनेक प्रवेश होत आहे. त्याची ताकद वाढत आहे. किंबहुना इतर पक्ष त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पहात आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे हे युद्ध सुरुच आहे. पण या युद्धातून आता इतर पक्ष आपला पक्ष मजबूत करण्याच्या विचाराने मनसेची मदत घेत आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता पुढे राज ठाकरे त्यांच्याबरोबर जाणार की एकटे लढणार यावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे जर मनसे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आगामी निवडणुकीत एकत्र लढले तर उद्धव ठाकरेंना हा नक्कीच धक्का असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा