मनसे च्या पदाधिकाऱ्यांना अटक; न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

रत्नागिरी, २१ ऑक्टोबर २०२२: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मनसेच्या तीन पदाधिकारी व कार्यकर्त्याना पोलीसांनी अटक केली असून, न्यायालयाने या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक दादू नांदगावकर, विद्यार्थी सेना तालूका अध्यक्ष प्रसाद शेट्ये व केदार वणंजू अशी पोलीस कोठडी झालेल्याची नावे आहेत.

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये व केदार वणंजू या तिघांना पोलीसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालया कडून या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे‌.

मुंबई उच्च न्यायालयात आज वैभव खेडेकर यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सूनावणी होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या फोन नॉट रिचेबल असून, खेडचे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा