मनसे राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवणार

बारामती, १८ डिसेंबर २०२०: येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे सर्व ताकतीनिशी निवडणूक लढवणार असून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज बारामतीमध्ये चार तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मनसे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर यावेळी उपस्थित होते.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे पॅनल उभे करणार आहे, तर जिथे शक्य नाही तिथे युती करून निवडणूक लढणार असल्याचा निर्णय आज बारामती मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष ऍड विनोद जावळे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे सांगीतले. काही ठिकाणी मनसे पॅनल उभा करणार, तर जिथे शक्य नाही तिथे युती करून लढणार असुन ग्रामपंचायतीमध्ये शिरकाव करणार असल्याचे वागसकर यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत बारामती, इंदापुर, दौंड, पुरंदर तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही चार तालुक्यातील ७०% जागांवर उमेदवार उभे करणार असुन सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा