मोबाईल मुळे होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

पुणे, ३१ जानेवारी २०२१: हल्ली काळ बदलला असून आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक मोबाईल आणि इंटरनेट झाला आहे. आज काल तर मोबाईल म्हणजे मानवाचा जीव की प्राण आशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जिथे जातो सोबत कोणी आसो नसो पण मोबाईल मात्र गरजेचा असतो आणि तो हमखास आपण बरोबर घेऊन निघतो.
एखाद्या लहान बाळासारखे तुम्ही तुमच्या मोबाईलला जपत असाल. म्हणजेच त्याला चार्जिंगला लावणं, कव्हर घेणं, फक्त मोबाईलसाठी कव्हर घेणं, वेळोवेळी त्याला जपणं वैगेरे पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे एव्हढं करूनही मोबाईल तुम्हाला काय देतो आणि आपण मोबाईल वर जास्त वेळ राहील्यावर किंवा झोपण्यापुर्वी चेक केल्यावर काय होते ते जाणून घेणार आहोत.
रात्री झोपण्यापुर्वी फोनचा सतत वापर केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होऊ लागते.
रात्री मोबाईल सारखा हातळल्यास झोपेवर वाईट परिणाम होतो.
शरीर व डोळे यांना आराम न मिळाल्याने चिडचिड पणा वाढतो.
स्ट्रेस आणि डिप्रेशनचेही कारण ही मोबाईल असू शकतो. सोशल मिडियामुळे हा त्रास जास्त होतो.
दृष्टीवर परिणाम होतो.
तुम्हाला हे माहित आहे का कि स्मार्ट फोन मधून निघणारा निळ्या प्रकाशामुळे ब्रेस्ट आणि प्राॅस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
या मुळे आज आधुनिकते मधे मोबाईल वापर हा काळाची गरज जरी बनला असला तरी तो आपल्या आरोग्यसाठी किती हानिकारक आहे.याकडे हि लक्ष देणं गरजेचं आहे.अन्यथा याचे परिणाम पुढील पिढी साठी आणखी घातक होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा