मोबाईल चार्जरने घेतला २ वर्षांच्या मुलीचा जीव, या देशात एका वर्षात ३५५ जणांचा करंटमुळे मृत्यू

ब्राझील, २८ ऑगस्ट २०२१: पूर्व ब्राझीलमधील अरेरे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.  मोबाइल फोन चार्जरला स्पर्श केल्याने दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.  स्थानिक अहवालांनुसार, चार्जरमध्ये विद्युत शॉक लागल्याने या लहान मुलीचा मृत्यू झाला.
सारा अल्वेस डी अल्बुकर्क या २ वर्षांच्या निष्पाप मुलीला विजेचा धक्का लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या लाखो प्रयत्नानंतरही तिला वाचवता आले नाही. तथापि, या अहवालात असे म्हटले नाही की मुलीला ज्या चार्टरने शॉप लागला तो चार्जर मान्यताप्राप्त ब्रँडचा आहे की नाही.  स्थानिक महापौर इमॅन्युएल गोम्स मार्टिन्स यांनी फेसबुकवर निष्पाप मुलीला श्रद्धांजली वाहिली.
 गेल्या वर्षी केवळ ब्राझीलमध्ये इलेक्ट्रिक शॉकमुळे ३५५ मृत्यू झाले आहेत ज्यात साराचा चा देखील समावेश आहे.  या घटनेपूर्वी २८ वर्षीय तरुणाचाही शॉक लागल्या मुळे मृत्यू झाला होता.  किट्टीसाक मूनकिट्टी नावाचा एक तरुण त्याच्या बेडरूममध्ये हातावर आणि शरीरावर जळलेल्या खुणा असलेल्या मृत अवस्थेत आढळला.  मृत अवस्थेत त्याने आपला हँडसेट धरला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा