मोबाईलची रिंग वाजण्याच्या वेळेत झाला बदल

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कॉल रिंगच्या वेळेवरुन युद्ध सुरू आहे. जिओने सर्वप्रथम रिंगचा वेळ बदलला होता. आता जिओशी स्पर्धा करण्यासाठी एअरटेल व व्होडाफोननेही आऊटगोईंग कॉल वेळ 25 सेकंदांपर्यंत कमी केला आहे.
या कंपन्यांचा मानक रिंग वेळ 30 सेकंद आहे. जागतिक स्तरावर या रिंगचा कालावधी 15 ते 20 सेकंद आहे. सरकारने आऊटगोईंगची 45 सेकंदांची वेळ निश्चित केली आहे.
ट्रायने आऊटगोईंग कॉल डेडलाईनचे प्रकरण निकाली काढण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांना 14 ऑक्टोबरला बोलावले आहे. दुसरीकडे जिओच्या या हालचालीमुळे एअरटेल आणि व्होडाफोनचे बरेच नुकसान झाले आहे.
6 सप्टेंबरला देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांची रिंग टाईमविषयी झालेल्या बैठकीत एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन व एमटीएनएल यांनी आऊटगोईंग कॉलसाठी कमीतकमी 30 सेकंदाच्या मर्यादेवर सहमती दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा