मणिपूरमध्ये आजपासून मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू

मणिपूर, २२ सप्टेंबर २०२३ : मणिपूरमध्ये मे महिन्यात हिंसाचार सुरू झाल्यानंतर मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. जवळपास साडेचार महिन्यांनी सर्व सामान्यांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आजपासून राज्यात इंटरनेट सेवा पुन्हा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री सिंग यांनी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आजपासून मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा जनतेसाठी खुली केली जाईल, अशी घोषणा केली. यापूर्वी जुलैमध्ये मणिपूर सरकारने राज्यात ब्रॉडबँड सेवा बंद करण्याची सूचना केली होती. राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा