नवी दिल्लीः सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने केल्यामुळे आता मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे. याचा फटका भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यावधी लोकांना बसणार आहे.
जगभरातील चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा भारतात मिळते. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची भारतीय बाजारात सर्वात जास्त भागीदारी आहे. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दोन्ही कंपन्यांचे १० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, सरकारला टेलिकॉम कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहे.
यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही सर्वात स्वस्त मोबाइल डेटा भारतात मिळतो आहे. १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर व्होडाफोन आयडिया वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.
याची घोषणा एअरटेलकडूनही करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि बीएसएनएलने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.