पुण्यात ठीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस

पुणे, दि. २४ जुलै २०२०: आज पुण्यात दुपारी १२.३० वाजल्यापासून विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्रच पावसाचा धुमाकूळ चालू होता मात्र पुण्यामध्ये पावसाने दडी मारली होती. पाऊस लांबणीवर पडला आहे की काय अशा चर्चा चालू असतानाच कालपासून पुण्यामध्ये पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली होती. पुणे हवामान खात्याने देखील येत्या ४८ तासांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्याला अनुसरून आज दुपारी पुण्यामध्ये ठिकाणी पावसाला सुरुवात झाली.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसांत राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर १४०, बल्लारपूर १३०, पोभुर्णा १००, मुल ९०, पौनी ८०, चामोर्शी, गौड पिंपरी, वणी ७०, जिवती, कोरपना ६०, भद्रावती, सोली ५०, मंगलूरपीर, राजुरा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय सर्वदूर हलका पाऊस झाला होता़ मराठवाड्यातील अंबड ७०, किनवट, सोयेगाव ६०, शिरुर कासार ५०, हदगाव, हिमायतनगर, कळमनुरी, माहूर ४०, हिंगोली, खुलताबाद ३० मिमी पाऊस झाला होता.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा