मोदी सरकारकडून जुन्या कायद्यात बदल,१९८६ ची जागा घेणार हा नवीन कायदा..

नवी दिल्ली, २० जुलै २०२० : ग्राहक संरक्षण कायदा आजपासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला आहे.सरकारने गुरुवारी म्हणजेच,१५ जुलै रोजी देशभरात हा कायदा लागू करण्यासाठी अधिसुचना जारी केली होती.नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ची जागा घेणार असून त्यामुळे जुना कायदा कालबाह्य होणार आहे.नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक नवे अधिकार मिळणार आहेत.

जुन्या ग्राहक संरक्षण कायदा मध्ये सुधारणा करून मोदी सरकारने ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा देशभरात लागू केला आहे. मोदी सरकारकडून या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हा कायदा जानेवारी २०२० मध्ये लागू करण्यात येणार होता.परंतू काही कारणामुळे ते शक्य झालं नाही.

त्यानंतर यासंदर्भात तारीख मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली.मार्च महिन्यापासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे याकाळात ते शक्य झालं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा