पुढच्या महिन्यात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 24 कोटी जनतेला मिळणार आनंदाची बातमी ?

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022: सुमारे 24 कोटी खातेदारांना आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकार यावेळी व्याजदर वाढवू शकते, अशी आशा लोकांना आहे. वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील. सर्व EPFO ​​खातेधारकांचे लक्ष या बैठकीकडं लागलं आहे.

केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची निर्णय घेणारी संस्था, पुढील महिन्यात बैठक होणार आहे, ज्यामध्ये चालू आर्थिक वर्षातील व्याजदरांवर निर्णय घेतला जाईल. पीटीआयनुसार, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, ‘ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यामध्ये 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव सूचीबद्ध आहे.’

EPFO 2021-22 तसेच 2020-21 मध्ये 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवेल का? असं विचारलं असता पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. भूपेंद्र यादव हे सीबीटीचे प्रमुख आहेत.

मार्च- 2021 मध्ये, CBT ने 2020-21 साठी EPF ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर सेट केला होता. ऑक्टोबर-2021 मध्ये अर्थमंत्र्यांनी याला मान्यता दिली. त्यानंतर EPFO ​​ने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना 2020-21 साठी ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्याचे निर्देश दिले होते.

CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला जातो. मार्च-2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला. 2018-19 मध्ये EPFO ​​वर 8.65 टक्के व्याज देण्यात आलं होतं.

EPFO ने 2016-17 आणि 2017-18 मध्ये देखील 8.65 टक्के व्याज दिलं होतं. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्के होता. त्याचवेळी 2013-14 मध्ये 8.75 टक्के आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आलं होतं. मात्र, 2012-13 मध्ये 8.5 टक्के व्याजदर होता. 2011-12 मध्ये तो 8.25 टक्के होता.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की अलीकडंच, EPFO ​​ने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलंय की त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आणखी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा केलं आहे. संस्थेने 8.5 टक्के दरानं व्याज दिलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा