नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसद भवनात जवळपास पाऊन तास बैठक पार पडली.
या बैठकीनंतर शरद पवारांनी या बैठकीत चर्चेल्या मुद्द्यांची माहिती दिली. ही कोणतीही राजकीय भेट नसून राज्यातल्या शेतीच्या प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांमधील शेतींचं मोठं नुकसान झाले आहे. मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान दिसलेलं चित्र वेदनादायी होतं. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने मदत करावी, अशी विनंती पवार या वेळी केली आहे.
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली. तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही पाचारण करण्यात आले होते. या भेटीनंतर मोदींनी तातडीनं गृहमंत्री अमित शहा यांना बोलावलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.