मोदींची विरोधकांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदी शांत असतात, पण एकदा तोंडाची तोफ सुरु झाली की मग मात्र थांबत नाही । हेच चित्र दिसले संसदेच्या मोदींच्या भाषणात…
भाजप संधाने कॅांग्रेसवर टीका करण्याचं सोडलं नाही पण यंदाचे भाषण मात्र टीकास्त्रांचा भडीमार आहे, हे खरं . मोदींनी थेट पंडित नेहरुंपासूनच टीकेला सुरुवात केली. नेहरुंमुळेच गोवा दीर्घकाळ पारतंत्र्याचा राहिल्याचा गंभीर आरोप केल्यामुंळे वातावरण तप्त झालं आहे. पंडित नेहरुंना आपल्या आंतरराष्ट्रीय छबीची एवढी काळजी होती, की त्यांनी गोव्यात सैन्य पाठवले नाही. त्यांच्या या वागण्याने गोवा १५ वर्ष पारतंत्र्यात राहिल्याचा आरोप त्यांनी केला .

घराणेशाही या मुद्द्यांला त्यांनी हाक घातला. घराण्याच्या विरुध्द गेल्याने करुणानिधी, चरणसिंह, रामकृष्ण हेगडे यांची घराणी नष्ट केली. त्याचबरोबर घराण्यावर टीका केली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली गेली.

आंध्र प्रदेशच्या विभाजनात कॅांग्रेसच्या अहंकारामुळे माईक बंद केले. दोन्ही राज्यातील कटुता आजही कायम आहे. याला जबाबदार केवळ कॅांग्रेस आहे.
कॅाग्रेसमुळे देशात कोरोना पसरला आहे. या वक्तव्यामुळे राज्यात असंतोषाचे वातावरण पसरले. याचा परिणाम कुठेतरी निवडणुकीवर परिणाम होईल का नाही याचा विचार करणे भाजपने अत्यंत महत्वाचे आहे.

मोदींचे संसदेतील भाषण नक्कीच जहाल होते. पण त्यांनी उत्तरप्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधाने केली तरी महत्त्वाच्या निवडणुका अजून बाकी आहेत. तेव्हा पक्षाने सारासार विचार करण्याची गरज आहे, हे नक्की . कारण राज्याचा निषेधाचा सूर नक्कीच महाग पडू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा