नवी दिल्ली, १४ मार्च २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार शस्त्रास्त्र खरेदीबाबत आत्मनिर्भर बनण्यावर जो भर दिला आहे. याचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ने अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार २०१३-१७ तसेच २०१८-२२ यांच्यामध्ये भारताच्या शस्त्र खरेदीत ११ टक्के घट नोंदवली आहे. मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत शस्त्र खरेदीबाबत आत्मनिर्भर बनण्यावर जो भर मोदी सरकारने दिला आहे.
गेल्या पाच वर्षात जगात जेवढी शस्त्रास्त्र खरेदी झाली त्यामध्ये एकट्या भारताने सर्वात जास्त म्हणजेच ११ टक्के शस्त्र खरेदी केले आहे. भारता खालोखाल साऊदी अरब ९.६ टक्के शस्त्र खरेदी करुन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर कतार ६.४ टक्के, ऑस्ट्रेलिया ४.७ टक्के, आणि चीन देखील ४.७ टक्के यांचा क्रमांक लागतो.
सोमवारीच संरक्षण राज्यमंत्री अजत भट्ट यांनी राज्यसभेत सांगितले की, २०१८-१९ या वर्षात संरक्षण बजेटमध्ये विदेशी खरेदी ४६ टक्क्यांवरुन ३६.७ टक्क्यांवर आली आहे. २०२४-२५ पर्यंत भारताने एक लाख ७५ हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे खरेदी करण्याचे लक्ष ठेवले आहे. यासोबतच निर्यात ३५ हजार कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर