यंदा मान्सून सामान्य राहणार… हवामान विभागाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण यंदा नेहमीसारखंच राहील असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने व्यक्त केला आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०४ टक्के पाऊस होईल असं अनुमान आहे. भारतीय उपखंडातल्या मान्सूनची पूर्वसूचना देणाऱ्या एल निनो प्रवाहांच्या स्थितीत फार बदल झालेला नाही तसंच होणारही नाही असा अंदाज असल्याचं हवामानविभागाने म्हटलं आहे.

परिणामी, नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) या काळात ± ५% मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधी सरासरीच्या ९८% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९६१-२०१० या कालावधीत संपूर्ण देशभरात हंगामी पर्जन्यमाची दीर्घ कालावधी सरासरी ८८ सेंमी इतकी राहिली आहे.

समतोल अल निनो आणि दक्षिणी दोलायमान परिस्थिती ,प्रशांत महासागरावर आहे आणि . समतोल हिंद महासागर द्विध्रुव परिस्थिती ( आय ओ डी ) ने हिंद महासागर व्यापलेला आहे. नवीन जागतिक मॉडेलचा अंदाज दर्शवितो की , अल निनो आणि दक्षिणी दोलायमानची सद्य परिस्थिती विषुववृत्तीय प्रशांत क्षेत्रावर कायम राहण्याची शक्यता आहे . आगामी पावसाळी हंगामात हिंद महासागरामध्ये , अल निनो आणि दक्षिणी दोलायमानची नकारात्मक परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे.

प्रशांत आणि हिंद महासागरावरील समुद्री पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) भारतीय नैऋत्य मोसमी पावसावर जोरदार प्रभाव पाडणारे म्हणून ओळखले जात असल्याने भारतीय हवामान विभाग या महासागरांच्या खोल सागरी पृष्ठभागावर विकसित होणाऱ्या परिस्थितीची काळजीपूर्वक देखरेख करीत आहे.

भारतीय हवामान विभाग मे , २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अद्ययावत अंदाज जारी करेल.एप्रिलचा अंदाज अद्ययावत करण्याबरोबरच, , चार एकसमान क्षेत्रांसाठी नैऋत्य मोसमी पाऊस हंगामाचा (जून – सप्टेंबर ) अंदाज आणि जून महिन्याचा अंदाज देखील जारी करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा