नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्याच्या मागणीसाठी मूकमोर्चा

मुंबई, १५ एप्रिल २०२३ : थोर समाजसुधारक नाना शंकरशेठ यांनी लोक कल्याणासाठी हजारो एकर जमीन दान केली. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला धावे, या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मूकमोर्चा काढण्यात आला. १६ एप्रिल या रेल्वेदिनाचे औचित्य साधून नाना शंकरशेठ चौक ते मुंबई सेंट्रल टर्मिनस पर्यत हा मूकमोर्चा काढण्यात आला. मूकमोर्चात नाना शंकरशेठ यांची तसेच ब्रिटीश अधिकाऱ्याची वेशभूषा केलेले नाना समर्थक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

मोर्चाचे आयोजन नाना शंकरशेठ प्रतिष्ठान व अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे करण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस असे नामकरण करण्यासाठी प्रत्येक रेल्वेदिनाचे औचित्य साधून निदर्शने केली जातात. या संदर्भातील प्रस्ताव राज्यसरकारने मार्च २०२० ला मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तीन वर्ष उलटली तरी हा प्रस्ताव प्रलंबित आहे.

या मागणीनंतर आलेले रेल्वेस्थानक टर्मिनसच्या नाव बदलाचे प्रस्ताव मंजूर झाले असताना भारतात रेल्वे सुरू करण्यात सिंहांचा वाटा ज्यांचा होता त्यांचे नाव देण्यासाठी इतका उशीर का लागतो, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या. केंद्र सरकारने ३१ जुलैला नाना शंकरशेठ यांची १५८ वी पुण्यतिथी दिवशी त्यांचे नाव टर्मिनसला देण्याची घोषणा केली होती. यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आग्रह धरावा, अशी मागणी करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा