पुणे, २ फेब्रुवरी २०२१: वाढीव वीजबिल विरोधात आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा येथील महावितरण ऑफिसच्या बाहेर हा मोर्चा काढण्यात आला होता.
डाॅक्टर धेंडे माजी उपमहापौर पुणे व पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरण वर प्रभागाच्या २०००/- नागरिकांच्या सह्यांचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देउन वाढीव वीजबिल कमी करा मागणीचे पत्रक देण्यात आले.
चुकिची वीजबिल आकारणी, वाढीव वीजबिल, कोरोना काळात बंद असलेली धार्मीक स्थळ यांचे वाढीव वीजबिल, मा उर्जामंत्री यांनी दिलेले वीजबिल माफी चे आश्वासन या सर्व मुद्द्यावरून वितरण कंपनी ने तात्काळ वीजबिल माफ करावे व नागरिकांचे वीज कनेक्शन तोडु देणार नाही ही भूमिका आंदोलनावेळी मांडण्यात आली.
या मोर्चा मध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते, स्थानिक कार्यकर्ते विजय कांबळे, अनिल कांबळे, गणेश पारखे, भीमराव जाधव , गजानन जागडे, विनायक महाडिक, घनःश्याम पंचमुख, व ईतर सर्व प्रमुख उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे