पंजाब आणि हरियाणामधील आणखी शेतकरी दिल्लीत येणार, आंदोलन तीव्र

नवी दिल्ली, २ डिसेंबर २०२०: शासनाने केलेल्या चर्चेचा प्रस्ताव आल्यानंतरही ६ दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन थांबलेले दिसत नाही. एकीकडं पंजाबच्या क्रीडा विश्वातील नामांकित तारे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यात आले आहेत, तर दुसरीकडं पंजाब आणि हरियाणामधील आणखी शेतकरी दिल्लीत येण्याची तयारी करत आहेत. आधीपासूनच दिल्लीतील रस्त्यांवर शेतकऱ्यांनी ठेया धरला असताना आता आणखीन शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत त्यामुळं आता दिल्लीकरांची चिंता वाढली आहे.

बैठकीतील चर्चा विफल

त्याचवेळी काल शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये वाटाघाटी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. परंतु, ही चर्चा देखील निष्फळ ठरली. दुपारी तीन वाजता सुरू झालेली बैठक संध्याकाळी सातच्या सुमारास संपली. सरकारनं शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. सरकारशी झालेल्या चर्चेचा भाग असलेले शेतकरी नेते चंदा सिंह म्हणाले की, कृषी कायद्याविरूद्ध आमचं आंदोलन कायम राहील. सरकार कडून आम्ही आमच्या मागण्या मिळूच मग ते शांततेच्या स्वरूपात असो किंवा बंदुकीच्या गोळीच्या स्वरूपात. ते म्हणाले की, आम्ही पुन्हा चर्चेसाठी येऊ. आता सरकार आणि शेतकरी यांच्यात पुढील बैठक ३ डिसेंबरला होणार आहे.

शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत एपीएमसी कायदा व एमएसपीबाबत सरकारबरोबर सादरीकरण देण्यात आलं. सरकारने एमएसपीवर शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणाले की, शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आणि सरकारनं हा शेतकरी विरोधी कायदा मागं घेण्याचा विचार करावा अशी त्यांनी मागणी केली.

राशन आणि औषधांची व्यवस्था

पंजाब आणि हरियाणाच्या पंचायतींच्या आवाहनावर शेकडो शेतकरी लोकांकडून रेशन, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू गोळा करीत आहेत. गोळा केलेले हे सामान ट्रॅक्टरवर लादलं जात आहे जे आजपासून दिल्लीकडं रवाना होण्यासाठी सुरुवात होईल

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला दिल्लीत पाठवावं, जेणेकरून निदर्शकांना प्रोत्साहित करता येईल, असे आवाहन पंचायतीनं केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा