पुणे, २० सप्टेंबर २०२३ : काल संपूर्ण महाराष्ट्रात श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज, बुधवारी (२० सप्टेंबर) गणेश उत्सवाचा दुसरा दिवस आहे. गणपती उत्सवानिमित्त पुढील १० दिवस अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर आज सकाळी महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण झाले.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा प्रमुख सण आहे. हा सण इथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर ३६ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्षाचे पठण केले. हा कार्यक्रम मंदिर ट्रस्टने आयोजित केला होता. हा कार्यक्रम गणेश चतुर्थी उत्सवाचाच एक भाग आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड