प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत ४२ कोटीहून अधिक लोकांना वित्तीय सहाय्य प्राप्त

5

नवी दिल्ली, दि. २० जून २०२०: प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून केंद्र सरकारने महिला, गरीब जेष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना १.७० लाख कोटी रुपयांच्या मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेच्या जलदगती अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत ४२ कोटीहून अधिक गरीब लोकांना ६५,४५४ कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या विविध घटकाअंतर्गत साध्य केलेली प्रगती याप्रमाणे-

पीएम-किसानच्या पहिल्या हप्त्यापोटी ८.९४ कोटी लाभार्थींना १७,८९१ कोटी रुपयांचे वाटप

२०.६५ कोटी (१००टक्के) महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात पहिला हप्ता म्हणून १०,३२५ कोटी जमा. दुसरा हप्ता म्हणून २०.६२ कोटी (१००टक्के)महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात १०३१५ कोटी रुपये जमा. तिसरा हप्ता म्हणून २०.६२ कोटी (१००टक्के)महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात १०,३१२ कोटी रुपये जमा.

वरिष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग असलेल्या २.८१ कोटी लोकांना दोन हप्त्यात एकूण २८१४.५ कोटी रुपये वितरीत करण्यात आले. सर्व २.८१ कोटी लाभार्थींना दोन हप्त्यात लाभ हस्तांतरित करण्यात आले.

२.३ कोटी बांधकाम मजुरांना ४३१२.८२ कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले.

आतापर्यंत एप्रिलसाठी ३६ राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी, ११३ लाख मेट्रिक टन अन्नधान्याची उचल केली आहे. एप्रिल२०२० साठी ३६ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी ७४.०३ कोटी लाभार्थींना ३७.०१ एलएमटी अन्नधान्य वितरीत केले आहे. मे २०२० साठी ३६ राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी ७२.८३ कोटी लाभार्थींना ३६.४२ एलएमटी अन्नधान्य वितरीत केले आहे. जून २०२० साठी २९ राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी२७.१८ कोटी लाभार्थींना १३.५९ एलएमटी अन्नधान्य वितरीत केले आहे. तीन महिन्यासाठी निर्धारित ५.८ एलएमटी डाळींपैकी ५.६८ एलएमटी डाळी विविध राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या. १९.४ कोटीपैकी १६.३ कोटी कुटुंब लाभार्थींना ३.३५ एलएमटी डाळी वितरीत करण्यात आल्या. २८ राज्ये /केंद्रशासित प्रदेशांनी एप्रील्साठी डाळींचे १०० टक्के वितरण पूर्ण केले तर २० राज्ये /केंद्रशासित प्रदेशांनी मे साठी डाळींचे १०० टक्के वितरण पूर्ण केले तर ७ राज्ये /केंद्रशासित प्रदेशांनी जूनसाठी डाळींचे १०० टक्के वितरण पूर्ण केले.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकारने स्थलांतरितासाठी दोन महिन्यांसाठी मोफत धान्य आणि चणा वाटप जाहीर केले.१९ जून २०२० पर्यंत 36 राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी ६.३ एलएमटी धान्याची उचल केली आणि ३४,०७४ मेट्रिक टन चणा राज्ये/केंद्रशासित प्र्देशाना योजनेअंतर्गत पाठवण्यात आला.

एकूण ८.५२ कोटी पीएमयुवाय सिलेंडरची योजनेअंतर्गत एप्रिल आणि मे २०२० साठी नोंदणी करण्यात आली आणि त्यांचे वितरणही झाले. जून २०२० साठी २.१ कोटी पीएमयुवाय सिलेंडरची नोंदणी करण्यात आली आणि १.८७ कोटी पीएमयुवाय सिलेंडरचे लाभार्थींना मोफत वितरणही झाले.

ईपीएफओच्या २०.२२ लाख सदस्यांनी परत न करण्याचा एडव्हान्स म्हणून ऑनलाईन रक्कम काढण्याचा लाभ घेत ईपीएफओ खात्यातून ५७.६७ कोटी रुपयांचा लाभ घेतला.

१ एप्रिल २०२० पासून वाढीव दर अधिसूचित करण्यात आले. चालू वित्तीय वर्षात ८८.७३ कोटी मानव दिवस कामाची निर्मिती करण्यात आली. मजुरी आणि साहित्य यांची प्रलंबित देणी भागवण्यासाठी ३६३८९ कोटी रुपये राज्यांना जारी करण्यात आले.

६५.७४ लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात २४% ईपीएफ योगदानापोटी ९९६. ४६ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.

डीएमएफ अंतर्गत राज्यांना 30टक्के निधी म्हणजे ३,७८७ कोटी रुपये खर्च करण्यास सांगण्यात आले असून आतापर्यंत १८३.६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

३० मार्च २०२० पासून सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना कार्यान्वित करण्यात आली. न्यू इंडिया एश्युरन्स या योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेला सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा