गेल्या २४ तासात आढळले ६० हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई, २० ऑगस्ट २०२०: सध्या देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर सर्व कामकाज, कार्यालय व कंपन्यादेखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, असे होत असताना कोरोना रुग्ण सापडण्याची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढ पुन्हा ६० हजारांपेक्षा जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ६४ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद झाली तर, १,०९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरातील करोना रुग्णांचा आकडा २७ लाख ६७ हजार २७३ वर तर, मृत्यू ५२ हजार ८८९ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी ६० हजार ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण २० लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही सर्वाधिक ७३.६४ टक्क्यांवर गेले आहे. संसर्ग दर ८.०५ टक्के असून मृत्यू दर १.९१ टक्के आहे. करोनाबाधितांपैकी २४.४५ टक्के म्हणजेच चारमध्ये एक रुग्ण उपचाराधीन आहे. एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या ६ लाख ७६ हजार ५१४ आहे.

सलग दुसऱ्या दिवशी ८ लाखांपेक्षा जास्त नमुना चाचण्या केल्या गेल्या. १० लाख लोकसंख्येमागे २३ हजार चाचण्या होत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ८ लाख १,५१८ चाचण्या झाल्या असून एकूण ३.१७ कोटी चाचण्या करण्यात आल्या

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा