देशभरातील ९९ टक्क्यांहून अधिक शहरे ओपन डेफिकेशन फ्री

नवी दिल्ली ३ ऑक्टोबर,२०२०: केंद्र सरकारने आज सांगितले की देशभरातील ९९ टक्क्यांहून अधिक शहरे ओपन डेफिकेशन फ्री, ओडीएफ बनली आहेत. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या वतीने आज स्वच्छ भारत मिशन – शहरी भागातील सहा गौरवशाली वर्ष साजरा करण्यात आला आणि ‘स्वच्छता के ६ साल, बेमिसाल’ वर वेबिनार आयोजित करण्यात आला.

गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, आम्ही ” स्वच्छतमभारत अंतर्गत स्वच्छ आणि स्वस्थ भारतासाठी पुन्हा प्रतिज्ञा करत आहोत.

ते म्हणाले, जन सर्वेक्षण आणि जन भागीदारी या भावनेचे उदाहरण स्वच्छ सर्वेक्षण २०२० ने दिले असून या सर्वेक्षणात १२ कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत. पुरी म्हणाले की, जेव्हा २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन-नागरी योजना सुरू केली गेली, तेव्हा २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत गाठायचे होते.

गृहनिर्माण व शहरी कामकाज सचिव दुर्गा शंकर मिश्रा म्हणाले, २०१४ मध्ये शून्य ओडीएफ राज्ये आणि शहरांच्या स्थितीनुसार, ९७ टक्क्यांहून अधिक शहरे आता ओडीएफ झाल्या आहेत. ते म्हणाले, २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशनमध्ये १८ टक्के घनकच-यावर प्रक्रियावरून आता ६७ टक्के घनकच-या वर आता प्रक्रिया होत आहे आणि ७५ टक्क्यांहून अधिक प्रभाग स्त्रोत वेगळा करण्याचा सराव करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा