पुणे, १४ सप्टेंबर २०२०ः राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या ही विक्रम मोडत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे. पुण्यात काल २४ तासांत विक्रमी ४१३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण सापडलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरातील १ हजार ९७८ रुग्ण आहे, पिंपरी-चिंचवडमधील १ हजार १८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७८८, नगरपालिका क्षेत्रातील २२१ आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील १०९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा २ लाख २४ हजार ८२६ इतका झाला आहे.
काल दिवसभरात ३ हजार ७७६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामधील पुणे शहरातील १ हजार ५८७ पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ६८२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३५६, नगरपालिका क्षेत्रातील ९६ आणि कँटोन्मेंट बोर्डमधील ३६ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे ५ हजार १४३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये शहराबाहेरील १७८ जणांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे