राज्यात शासकीय खात्यांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्त

बारामती : राज्यात जिल्हा परिषद आणि शासकीय खात्यांमध्ये मिळून आतापर्यंत तब्बल २ लाख १९३ पदे रिक्त आहेत.
सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती दिली आहे.
नितीन यादव यांनी शासनाकडे सर्व विभागांमध्ये मिळून ३१ डिसेंबर २०१९ अखेर मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची संख्या मागवली होती.
त्यानुसार शासकीय पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे ही सरळसेवा भरतीतील पदे आहेत, जी रिक्त आहेत.
पदोन्नतीतून भरली जाणाऱ्या पदांची संख्या तब्बल ५८ हजार ८६४ एवढी आहे. राज्यात ७० हजार पदांची भरती होणार असल्याचे महाविकास आघाडी सरकार सांगत आहे.
सरळसेवा भरतीतूनच शासनाला दीड लाख पदांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात ही पदे भरली जाणार का याची उत्सुकता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा