मोरगाव ग्रामपंचायतीचा दुकाने सुरू करण्याचा निर्णय

बारामती, दि.१२ मे २०२०: बारामती सोशल डिस्टन पाळत अष्टविनायक क्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील दुकाने उघडण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेला आहे. मात्र या
दुकानांमध्ये सलून, कापड व्यवसाय, बियर बार, हॉटेल, पान टपरी यांचा अपवाद आहे. रविवारी पूर्णपणे गाव बंद ठेवले जाणार असल्याची माहिती सरपंच निलेश केदारी  यांनी दिली.

कोरोनाचा जंतू संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मोरगाव येथील अत्यावश्यक मेडीकल, दवाखाने, किराणा वगळता
दुकाने बंद होती. त्यामुळे अनेकांच्या पोटा -पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आज ग्रामपंचायत, प्रशासन पोलीस व महसूल यांनी एकत्र निर्णय घेत ही दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी किराणा मालाची दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत उघडी ठेवली जाणार आहेत. तर मंगळवार, गुरुवार, शनिवार या
दिवशी हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, सोन्याची दुकाने, मोबाईल शॉपी सह इतर दुकाने  सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतील.
कोरोनाचा जंतू संसर्ग टाळण्यासाठी सलून , कापड व्यवसाय, ब्युटीपार्लर ,हॉटेल , बियर बार, पान टपरी, ढाबा   ही दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर शेतकरी व व्यापाऱ्यांनी तरकारी व शेतमाल  फिरून विकावा, असे आवाहन त्यांनी एका परिपत्रकाद्वारे केलेल्या आहे.

रविवारी मात्र संपूर्ण गाव पूर्णपणे बंद राहणार आहे. याचप्रमाणे सोशल डिस्टन्स अवलंब न केल्यास ग्राहकांना शंभर  तर  दुकानदारांना दोन हजार रुपये दंड पोलीस प्रशासनामार्फत आकारला जाणार असल्याचे त्यांनी या परिपत्रकामध्ये दिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा