शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

11

पुणे, ५ सप्टेंबर २०२३ : शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

शहीद जवान दिलीप ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड, उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर.आर.जाधव, लष्कराचे विविध आजी- माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कारगिल येथे कर्तव्य बजावत असताना दिलीप ओझरकर शहीद झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर