कोलकाता ४ जुन २०२३ : पश्चिम बंगालच्या दुबराजपूरमध्ये ‘मियाझाकी’ जातीचा जगातील सर्वात महागडा आंबा आढळला आहे. सामान्यतः जपानमध्ये आढळणारा हा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख ७० हजार रुपये प्रति किलोने विकला जातो. साईजनुसार एक आंबा १० ते १५ हजार रुपयांना विक्री होतो. पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या या झाडाला यंदा ८ आंबे लागलेत.
मियाझाकी आंब्याचे वजन ३५० ग्रॅम असते. या प्रकारच्या आंब्याची लागवड एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान केली जाते. आंबा पिकल्यानंतर सुरुवातीला त्याचा रंग जांभळा असतो. त्यानंतर पूर्ण पिकल्यानंतर तो गडद लाल होतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सय्यद सोना नामक व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी परदेशातुन मियाझाकीचे एक रोप आणले. ते त्यांनी स्थानिक मशिदीच्या आवारात लावले. आता त्या रोपाचे झाड झाले असून, त्याला ८ आंबे लागले आहेत.
स्थानिक मशिदीत लावलेल्या या आंब्याचा शुक्रवारी तेथील अधिकाऱ्यांनी लिलाव केला. या लिलावात त्यांना लाखो रुपयांचीे उत्पन्न मिळाले. ही रक्कम मशिदीच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.