ओटावा, कॅनडा १९ जून २०२३ : भारतातील मोस्ट वाँटेड खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडाच्या सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वाराबाहेरच गोळी घालून हत्या करण्यात आली. दोघा अज्ञात बाईकस्वारांनी निज्जर याला गोळ्या घातल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. निज्जरला गोळ्या घातल्यानंतर दोन्ही बंदूकधारी फरार झाले. मोस्ट वाँटेड खालिस्तांनी म्हणून भारताने घोषित केलेल्या निज्जरवर भारताने दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हरदीप सिंग हा मूळचा पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील राहणारा होता. सध्या हरदीप सिंग निज्जर हा कॅनडातील शीख फॉर जस्टिस या संघटनेचा प्रमुख तसेच खालिस्तानी टायगर फोर्सचाही प्रमुख होता. तो कॅनडात बसून भारताच्या विरोधात कारवाया करायचा. सध्या भारतीय तपास यंत्रणा कॅनडाच्या तपास यंत्रणाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहेत.
पंजाबच्या जालंधरमध्ये २०२१ मध्ये हरदीप सिंग निज्जर यांने एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केलेली त्यानंतर तो चर्चेत आला. त्यानंतर त्याने पंजाबमधील अनेक कारवायात त्याचा सहभाग होता. गेल्या वर्षी त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याला फरार म्हणूनही घोषित करण्यात आलेले. भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होते, त्यावेळी भारतीय दुतावासासमोर खालिस्तांनी संघटना शीख फॉर जस्टिसच्या अतिरेक्यांनी जोरदार निदर्शने केली होती. भारताच्या विरोधात भावना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप होता. एनआयए कडून त्याला मोस्ट वाँटेड अतिरेकी म्हणूनही घोषित करण्यात आले. भारताने चाळीस मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये त्याचे नाव होते.
निज्जर गेल्या काही वर्षापासून कॅनडात राहुन खालिस्तानी चळवळीला बळ देण्याचे काम करत होता. गेल्या वर्षभरापासून तर तो भारतीय तपास यंत्रणांची डोकेदुखी बनला होता. कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांना, लॉजिस्टिकसाठी रसद पुरवण्याचे काम सुरू केलेले. या आधीच निज्जरच्या दोन सहकाऱ्यांनाही फिलिपाईन्स आणि मलेशियातून अटक करण्यात आली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर