आईचा आंत्यविधी वरूण तिने दिला दहावीचा पेपर

आंबेगाव: मंगळवारी दहावीचा मराठीचा पेपर आणी सोमवारी रात्री आईने जगाचा निरोप घेतला. या परिस्थितीला काळजावर दगड ठेवून आईचे अंत्यदर्शन घेऊन आंबेगाव तालुक्‍यातील धामणी येथील ज्ञानेश्‍वरीने आज दहावीचा पेपर दिली.

सोमवारी (दि. २) रात्री सविता दादाभाऊ गवंडी (वय ३३) या महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. घटना घडली त्यावेळी इयत्ता दहावीत असणारी ज्ञानेश्वरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने शेजारीच अभ्यास करत बसली होती; मात्र रात्रीच्या वेळी आईचे अचानकपणे निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. मंगळवारी (दि. ३) सकाळी ज्ञानेश्वरीने आईचे अंत्यदर्शन घेतले आणि अंत्यविधी झाल्यानंतर थेट परीक्षा केंद्रावर ती दहावीचा पेपर देण्यासाठी गेली. आई मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेल आसे आर्त शब्द पुटपुटत होती त्यामुळे  तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. यावेळी तिचे वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला.

या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील दादाभाऊ यांनी शेती व्यवसायातून दोघां मुलांचे शिक्षण करत आहे मात्र दोन वर्षांपासून सविता ह्या आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. अखेर त्यांच्या निधनामुळे  परिसरात शोककळा पसरली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा