जामखेड, ४ ऑगस्ट २०२० : महाराष्ट्रात आज देखील मुलगा मुलगी हा भेदभाव पहायला मिळतोय. पुर्वी या भेदभावमुळे अनेक संसार हे उद्वस्त होत होते. काळ बदलत गेला आणि परिस्थिती देखील बदलत गेली. काळानुरुप समाजाने भेदभावाचा दृष्टीकोन हा कमी केला आणि मुलगा मुलगी समान कायद्याची शिकवण देऊ लागले. मात्र आज घडीला देखील काही ठिकाणी असा भेदभाव हा बघायला मिळतो. आणि हा त्रास कधी कधी इतका खालच्या थराला जातो कि या भेदभावाचा कोणीतरी निष्पाप जीव हा बळी ठरतो.
अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या ३ मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीला ३ मुली झाल्या मुलगा का झाला नाही म्हणून पती (राम कार्ले) हे रोज पत्नीच्या छळ करत असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.
तर या जाचालाच कंटाळून (स्वाती कार्ले) आई ने आपल्या सह ३ निष्पाप जीवांचे देखील आयुष्य संपवले. या प्रकरणात फिर्यादी वरुन पोलिसांनी पती,सासू,सास-याला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी